शाहरुखला आवडते सलमान कैटची जोडी

बॉलीवूडमधील सुपरस्टार शाहरुख व सलमान खान यांच्यात गेले काही दिवस वाद आहे. त्यामुळे दोघांमध्ये सध्या अबोला आहे. असे असले तरी दोघां मधील एकमेकाच्या बाबतीतले गैरसमज मात्र कमी होताना दिसत आहेत. अबोला असला तरी या दोघांनी सध्या एकमेकाबाबत प्रतिक्रिया व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.

एका कार्यक्रमानिमित्त शाहरुख आला तेव्हा काही जणांनी सलमान व कैटच्या जोडीबद्दल काय वाटते असे त्याला विचारले. शाहरुखने लगेच ‘ दोघे सोबत असताना खूप चांगले वाटतात. त्यांची जोडी मला देखील आवडते.’ असे उत्तर दिले. याशिवाय त्याने दोघांच्या आगामी ‘एक था टायगर’ सिनेमला शुभेच्छा दिल्या. शाहरुख म्हणाला, सलमान आणि कतरिनाने बऱ्याच सिनेमामधून एकत्रित काम केले आहे. केमेस्ट्री हा एक असा शब्द आहे की, तो त्यांच्या बाबतीत बरोबर लागू पडतो. केमेस्ट्री मुळेच मी आणि काजोलसुद्धा काही काळ लाइमलाईटमध्ये राहिलो.

या चित्रपटानंतर आगामी काळात कैतरिना ‘ये कहा आ गये हम’ यामध्ये शाहरुख खान सोबत काम करणार आहे. या सिनेमाचे शूट या वर्षअखेरीस सुरु होणार आहे.

Leave a Comment