अक्षय कुमार करणार सेन्चुरी

बॉलीवूडचा रावडी अक्षय कुमार लवकरच त्याच्या चित्रपटाची सेन्चुरी करणार आहे. ३१ ऑगस्ट रोजी रिलीज होत असलेला ‘जोकर’ हा अक्षयचा शंभरावा चित्रपट असणार आहे. या चित्रपटात त्याने शास्त्रज्ञची भूमिका केली असून पुन्हा एकदा नायिका म्हणून सोनाक्षी सिन्हा त्याच्या सोबत झळकणार आहे.

काही दिवसापूर्वीच अक्षय कुमार व सोनाक्षीचा रावडी राठोड हा चित्रपट हिट ठरल्याने ही जोडी सध्या फॉर्ममध्ये आहे. त्याच्या रावडी स्टाईलची चर्चा जोरात सुरु असताना याच मूडमध्ये ‘जोकर’ हा चित्रपट येत आहे. या मध्ये एलियंसवर रिसर्च करणाऱ्या शास्त्रज्ञची भूमिका त्याने केली आहे.

अक्षयच्या कारकिर्दीतील हा शंभरावा चित्रपट असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. २०१२ हे वर्ष अक्षयच्या करीयरच्या दृष्टीने लाभदायक ठरले आहे. त्याचा हा शंभरावा चित्रपट असला तरी त्याने सासरे राजेश खन्ना यांच्या निधनामुळे फारसा गाजावाजा केलेला नाही. त्याबरोबरच या चित्रपटाचे प्रमोशनसाठी सुद्धा तो जास्त काळ फिरला नाही असे समजते.

Leave a Comment