दहीहंडीमध्ये सहभागी होणार बॉलीवूड

श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त सर्वत्र मोठ्या उत्साहत दहीहंडीचा उत्सव साजरा केला जाणार आहे. हा दहीहंडीचा माहोल कॅश करण्यासाठी काही मोठ्या मंडळांनी बॉलीवूडमधिल सेलेब्रिटीजना निमंत्रित केले आहे. सेलेब्रिटीजच्या सहभागामुळे दहीहंडी महोत्सव चांगलाच रोमांचित करणारा होणार आहे.

अग्निपथमधील दही हंडी सीनमधून गोविंदांना रोमांचित करणारा रितिक रोशन वरळी येथील जम्बुरी मैदानात उतरणार आहे. याबाबत रितिक म्हणाला, ‘ मी पहिल्यांदाच एवड्या गर्दीच्या ठिकाणी जात आहे. या इवेंटमध्ये लहानपणी मी सहभागी झालो होतो. त्यानंतर आत्ताच गोविंदा सोबत धमाकेदार परर्फोर्मंस साजरा करणार आहे.’

ड्रीमगर्ल हेमा मालिनीची मुलगी ईशा देओल ही हजारो गोविंदा पुढे राधाच्या रुपात ‘बैले डान्स’ सादर करणार आहे. वरळीच्या जम्बुरी मैदानात होणाऱ्या या दही हंडी इवेंटमध्ये ४०० गोविंदा सहभागी होणार आहेत. याठिकाणी त्यांच्यासोबत रितिक व ईशा परर्फोर्मंस करणार आहे. त्याठिकाणी ‘सिरीयल किसर’ इम्रान हाश्मी गेस्ट म्हणून सहभागी होणार असून त्यासोबतच बॉलीवूडचा सुपरस्टार अक्षय कुमार ही या ठिकाणी उपस्थिती लावणार आहे.

Leave a Comment