दहीहंडी निमित्ताने सोनाक्षी वाढविणार मानधन

सोनाक्षी सिन्हाचा वट बॉलीवूडमध्ये चांगलाच वाढला आहे. पाठोपाठ हिट सिनेमे देऊन ती सॉलीड फॉर्ममध्ये आहे. तिने ‘ओह माई गॉड’ या सिनेमामध्ये ‘गो गोविंदा गो’ या गाण्यावर डान्स मास्टर प्रभू देवा सोबत आयटम सॉंग केले आहे. बऱ्याच दिवसापासूनची सोनाक्षीची आयटम सॉंग करण्याची इच्छा या गाण्यावर थिरकल्याने पूर्ण झाली आहे.

तिचे हे आयटम सॉंग ऐन गोकुळ अष्टमीच्या मुहूर्तावर पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता दही हंडी ग्रुप्सने सोनाक्षीला प्रोग्राममध्ये बोलविण्याचा धडाका लावला आहे. इवेंटमध्ये सहभागी होऊन तिने स्पेशल परफॉरमन्स सादर करावा यासाठी अनेक दहीहंडी ग्रुप तिला ऑफर्स देत आहेत. अर्थात तिने अजून कोणालाच होकार दिलेला नाही. मात्र या संधीचा फायदा घेत आपले मानधन वाढविण्याचा विचार सोनाक्षी करीत आहे.

काही दहीहंडी ग्रुप्सना सोनाचा स्पेशल डान्स हवा आहे. तर काही जणांना ती चीफ गेस्ट म्हणून हवी आहे. मानधन वाढवून घेण्यासाठी तिला थोडासा वेळ हवा असल्याने अजून तिने कोणालाच होकार दर्शविला नाही असे सांगितले जात आहे.

Leave a Comment