सल्लूमियाँची दिवानगी येत्या काळात त्याच्या फॅन्ससाठी थोडीसी महागात पडणार अशी शक्यता आहे. कारण रमजानच्या मुहूर्तावर रिलीज होत असलेल्या त्याच्या बहुचर्चित ‘एक था टायगर’ या सिनेमाचे तिकीट दर १२ ते १६ टक्क्यांनी वाढविण्याचा विचार सध्या सुरु आहे.

यापूर्वी सलमानचे ‘रेडी’ व ‘बॉडीगार्ड’ हे चित्रपट रिलीज होतानाही काही प्रमाणात तिकिटाच्या दरात वाढ करण्यात आली होती. मात्र ती कमी प्रमाणात झाली होती. आताची वाढ तुलनेने जादा आहे. सर्वसामन्याच्या खिशाला त्याची झळ बसणार आहे. सध्या फेस्टिव्हलचा मूड आहे. हे निमित्त साधून मल्टीप्लेक्स थियेटरचे मालक सलमानच्या ‘एक था टायगर’ च्या निमितान्ने चांगली कमाई करण्याच्या विचारात आहेत. दरवाढीचा हा निर्णय हा विचारपूर्वकच घेतला असल्याचे समजते.
सिनेमा क्षेत्रात अनेक वर्षे काम करीत असलेल्या फायनान्सर आनंद विशाल यांच्या मते, या दरवाढीमुळे २० रुपयानी तिकीटाचे दर वाढणार असून फेस्टिवलच्या निमिताने अशाप्रकारची दरवाढ दरवर्षी केली जाते. हा एक प्रिमियम प्रोडक्ट असून सलमानच्या सिनेमाला जादा प्रीमियम असतो त्यामुळेच असा निर्णय घेण्यात आला आहे.