तुषार पुन्हा एकदा ‘कुल’

तुषार कपूरचा ‘क्या सुपर कुल है हम’ सिनेमा आवडलेल्या प्रेक्षकासाठी एक गुड न्यूज आहे. या ‘कुल’ सिक़्वेल सिनेमाच्या तिसऱ्या भागाची निर्मिती लवकरच करण्यात येणार आहे. ‘क्या सुपर कुल है हम’ दोन वर्षापूर्वी आलेल्या ‘क्या कुल है हम’ या सिनेमाचा सिक़्वेल होता. आता आगामी काळात येणाऱ्या तिसऱ्या भागाचे टायटल ‘क्या सुपर डुपर कुल है हम’ असे असेल.

‘कुल’ सिरीजचा हा तिसरा भाग येणार असल्याचे कंफर्म आहे, असे तुषार कपूरने सांगितले. या सिक़्वेलच्या स्क्रिप्टचे काम सध्या सुरु आहे. मात्र शूट कधी सुरु होणार हे आताच सांगणे कठीण आहे. कदाचित ते पुढील वर्षी सुरु होईल असे तुषार म्हणाला.

तुषारचा हा सिनेमा सक्सेसफुल ठरल्याने त्याला बरेच दिवसांनी यश चाखायला मिळाले आहे. सध्या तुषारने ‘शूटआऊट एट वडाला’ या सिनेमावर फोकस केले असून या नवीन प्रोजेक्टमध्ये त्याला कितपत यश मिळेल हे आगामी काळात कळून येईल.

Leave a Comment