विश्व हॉकी लीग सुरू होणार ऑलिम्पिकच्या दोन दिवसानंतर

लंडन,दि.११ – लंडन ऑलिम्पिक स्पर्धा समाप्त झाल्यानंतर दोन दिवसांनी विश्व हॉकी लीग सुरू होणार आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या (एफआयएच) सर्व पाच महाद्वीपच्या राष्ट्रीय संघासाठी विश्व हॉकी लीग सुरू होईल.

या विश्व हॉकी लीगमध्ये दोन वर्षात चार राउंड खेळले जातील. ज्यात ६० पेक्षा जास्त राष्ट्रीय पुरूष व महिला संघ सहभाग घेतील. स्पर्धा लॉंच झाल्याच्या एक वर्षानंतर यात रॅकिंगमध्ये काबिज मुख्य आठ संघ सहभाग घेतील.

आंतरराष्ट्रीय पुरूष रँकिंगमध्ये भारत १०व्या स्थानावर काबिज आहे, तो स्पर्धेत दुसर्या राउंडमध्ये प्रवेश करेल. 

हे विश्व हॉकी लीग विश्वचषक व ऑलिम्पिक स्पर्धेसाठी क्वालीफाइंग स्पर्धा बनेल. वर्ष २०१४ विश्वचषकासाठी १२ क्वालीफाइंग स्थान असतील आणि यात बहुतांश देश खेळतील.

एफआयएचने त्याचा आर्थिक पक्ष किंवा व्यावसायिक भागीदारीची कोणतीही माहिती दिली नाही. मागील दीड दशकापासून आंतरराष्ट्रीय लीगची योजना बनवत असलेल्या एफआयएचने  लीगसाठी जे १९ स्थळ निवडले, त्यात नवी दिल्ली देखील समाविष्ट आहे.

एफआयएचला पूर्ण विश्वास आहे की, ही विश्व हॉकी स्पर्धा खूप महत्वपूर्ण बनेल. 

Leave a Comment