मॉडेल ते हिरोइन असा प्रवास करणारी इशा गुप्ता ‘जन्नत-२’ या सिनेमामधून गॅलमरस लूक व अॅकटिंगमुळे प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली आहे. येत्या काही दिवसातच ती पुन्हा भट्ट कॅम्पच्या ‘राज-३’ मधून एन्ट्री करणार आहे. पहिल्यांदाच ती हॉरर सिनेमाचा एक हिस्सा ती बनली आहे.
लीड रोलनंतर ‘राज-३’ सिनेमात बिपाशा सोबत असिस्टंट रोल करताना आलेला अनुभव सांगताना इशा म्हणाली, ‘ रोल कुठला आहे त्यापेक्षा त्या सिनेमामध्ये काम करण्याची संधी महत्वाची आहे. तसे पहिले तर प्रकाश झा यांच्या ‘चक्रव्यूह’मध्ये माझा रोल छोटा असला तरी इंटरेस्टिंग आहे. ‘राज-३’ या सिनेमामध्ये मी संजनाचा रोल करीत आहे. जिच्या इशाऱ्यावर संपूर्ण इंडस्ट्री चालते असा रोल मी केला आहे. त्यामुळे बिपाशा ही बिपशा आहे तिच्या सोबत मी कधीच तुलना करणार नाही. ती खूप दिवसापासून इंडस्ट्रीमध्ये काम करीत आहे. बिपाशा सिनियर असल्याने तिने माझ्या सारख्या नवख्या कलाकारला या सिनेमच्या माध्यमातून संभाळून घेतले आहे.’
‘राज-३’ च्या पोस्टरवर स्थान देण्यात न आल्याने मी नाराज आहे अशा अफवा काही जणांनी पसरविल्या होत्या. त्याबाबतीत मी नाराज नसून पोस्टरवर बिपाशाला प्रमोट करण्याचा विचार प्रोडूसरचा आहे. गेल्या काही दिवसापासून ‘चक्रव्यूह’च्या सेटवर शूटमध्ये बीझी असल्यामुळे तिकडे लक्ष नसल्याचेही इशा म्हणाली.