पुणे: जंगली महाराज रस्त्यावरील बॉम्बस्फोट प्रकरणी पोलिसांनी बीड येथून एका संशयिताला अटक केली आहे. त्याचा बॉम्बस्फोटाच्या कटात सहभाग असल्याची पोलिसांची शंका आहे.
पुणे बॉम्बस्फोट प्रकरणी बीडमधून संशयिताला अटक
अब्दुल रफी असे दहशतवाद विरोधी पथकाने अटक केलेल्या संशयिताचे नाव असून तो सन २००५ ते २००९ या कालावधीत सौदी अरब अमिरातीत होता. त्याचा पुणे बॉम्बस्फोटाच्या कटात नेमका काय प्रकारचा सहभाग आहे; हे सांगण्यास पोलिसांनी नकार दिला.
पुण्यातील गजबजलेल्या जंगली महाराज रस्त्यावर १ ऑगस्टच्या संध्याकाळी ४ बॉम्बस्फोट झाले. यात एक जण जखमी झाला.
