राळेगणमध्ये अण्णा घेत आहेत विश्रांती

अहमदनगर: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी तीन दिवसांपासून यादवबाबा मंदिराच्या खोलीत स्वत:ला बंदिस्त करून घेतले आहे. मात्र अण्णा मौनात नसून अशक्तपणा आल्याने विश्रांती घेत आहेत; असे अण्णांचे सहकारी दादा पठारे यांनी सांगितले.

दिल्ली येथे उपोषण संपवून राजकीय पर्याय उभा करण्याची घोषणा केल्यानंतर राळेगण सिद्धी येथे आल्यापासून अण्णांनी यादवबाबा मंदिरात स्वत:ला बंदिस्त करून घेतले आहे. ते आल्यापासून कोणाशीही बोलले नाहीत. मात्र त्यांचे लिखाण सुरू असून स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी अण्णा स्वत: अथवा ब्लॉगमार्फत लोकांशी संवाद साधतील; असे सांगण्यात आले.

अण्णांनी मौन धारण केलेले नाही. मात्र उपोषणामुळे त्यांना थकवा आला आहे. त्यामुळे ते विश्रांती घेत असल्याचे पठारे यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment