मोदींहून नितीशकुमार सरस: सरसंघचालकांचा निर्वाळा

नवी दिल्ली: गुजरातपेक्षा बिहारमधील नितीशकुमार यांच्या सरकारच्या कारभाराचा दर्जा अधिक चांगला असल्याचे मत व्यक्त करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या महत्वाकांक्षेला खो घातला आहे.

पंतप्रधानपदी कोण असावे हे भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी ठरवेल; असेही भागवत म्हणाले.

एकेकाळी गुजरातचे प्रशासन हा देशासमोर आदर्श होता. मात्र नितीशकुमार यांच्या सरकारने विकासाची शक्यता संपुष्टात आलेल्या बिहारमध्ये कार्यक्षम कारभाराने नवा आदर्श निर्माण केला आहे; असे भागवत यांनी राजधानीत विदेशी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मध्यप्रदेश आणि छत्तीसगड सरकारांच्या कामाबाबातही सरसंघचालकांनी समाधान व्यक्त केले.

Leave a Comment