ओलोपिंक स्पर्धेचे शेवटचे पाच दिवस शिल्लक असताना भारताच्या पदरात किती ‘मेडल’ मिळणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे. आतापर्यंत तीन ‘मेडल’ मिळाले असून सेमीफायनलमध्ये मेरीकोम पोहचली असल्याने तिच्या माध्यामातून आणखीन एक ‘मेडल’ फायनल झाले आहे. दुसरीकडे ४९ किलो वजन गटात देवेंद्र सिंह क़्वॉटर फायनलमध्ये पोहचला आहे. बुधवारी होणाऱ्या लढतीत देवेंद्र विजयी ठरला तर भारताच्या पदरात पाचवे ‘मेडल’ पडणार आहे.
बुधवारी मध्यरात्री १.१५ वाजता ४९ किलो वजन गटात बॉक्सर देवेंद्र सिंह नशीब अजमावणार आहे. त्याची लढत आयर्लंड पेडी बैरेंस सोबत होणार आहे. आतापर्यंतची देवेन्द्र्ची कामगिरी पाहता हे लढत तो सहज जिंकेल असे वाटते. त्याने ही लढत जिंकली तर भारताला आणखीन एक मेडल मिळेल.
मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या फायनल लढतीत भारताचा थाळीफेकपटू विकास गौडा हा आठव्या क्रमांकावर राहिला. क्वालिफाय फेरीत तो पाचव्या क्रमांकावर राहिल्याने तो अंतिम फेरीत मेडल जिंकेल अशी अशा होती. मात्र त्याची घसरण झाल्याने मेडल मिळण्याची अशा संपुष्टात आली आहे.
