अमली पदार्थ घेणार्‍यांना चीनमध्ये वाहनपरवाना नाही

बिजिंग दि.८ – अमली पदार्थांचे सेवन करणार्‍यांना वाहनचालक परवाना न देण्याचा निर्णय चीन सरकारने घेतला असून त्याची अम्मलबजावणीही सुरू करण्यात आली आहे. अमली पदार्थांचे सेवन करून वाहने चालविण्याच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी हा कायदा केला गेला असून ज्यांची अमली पदार्थ घेण्याची सवय सुटलेली नाही त्या सर्व वाहनचालकांनी आपापले परवाने तीस दिवसांच्या आत रद्द करावेत असा अर्ज करावयाचा आहे. तसे सर्कुलरच जारी करण्यात आले असून जे वाहनचालक असे अर्ज भरणार नाहीत त्यांचा परवाना आपोआपच रद्द होणार आहे.

वाहनचालकाच्या परवान्याचे अर्ज यापुढे पोलिस स्वीकारू शकणार नाहीत असाही आदेश काढण्यात आला आहे. मादक पदार्थ घेण्याचा इतिहास असलेल्या चालकांना शाळांच्या बस कधीही चालविता येणार नाहीत असेही स्पष्ट करण्यात आले आहे. अशा पदार्थांचे सेवन करून एप्रिलमध्ये शाळाबस चालकाकडून झालेल्या अपघातात १४ विद्यार्थी ठार झाल्याची घटना घडली होती. त्यानंतरच हा कायदा आणण्यात आला आहे.

Leave a Comment