दही हंडीसाठी हॉट सनी लिओन प्रमुख पाहुणी

पुणे दि.८ – जिस्म टू या हॉट सिनेमाच्या हॉट पोस्टरमुळे एकदमच चर्चेत आलेल्या सनी लिओन या अभिनेत्रीला पुण्यातील राष्ट्रवादीच्या नेत्याने दही हंडी कार्यक्रमाची प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रण केले असून त्यासाठी तिला पाच लाख रूपये देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. सनीने हे आमंत्रण स्वीकारले असल्याने यंदाची या मंडळाची दहीहंडी जोरात होणार असल्याची चर्चाही शहरात सुरू आहे.

विशेष म्हणजे जिस्म टू या चित्रपटाची पोस्टर झळकविल्यावर त्याबद्दल नाराजी व्यक्त करणार्‍या अनेकांत राष्ट्रवादीचे बडे नेतेही सामील होते.मात्र अखिल बावधन दहीहंडी मंडळाचे अध्यक्ष व राष्ट्रवादीचे उपजिल्हाध्यक्ष व नेते किरण दगडे पाटील यांनी मात्र त्यांच्या एका मित्राच्या ओळखीने सनी लिओनशी संपर्क साधून तिला प्रमुख पाहुणी म्हणून आमंत्रण केल्याने राष्ट्रवादीच्या मुंबई युनिटमध्ये अस्वस्थता पसरली आहे. सनी लिओन ही मूळ भारतीय वंशाची कॅनेडियन पोर्नस्टार म्हणून प्रसिद्ध आहे. दगडेपाटील यांचे या बाबत असे म्हणणे आहे की त्यांचे मंडळ दहीहंडीचा उत्सव प्रत्येक वर्षीच मोठ्या प्रमाणावर साजरा करते आणि अशा प्रसिद्ध लोकांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलविले जात असते. सनी लिओनला उपस्थित राहण्यासाठी मंडळातर्फे पाच लाख रूपये देण्यात येणार आहेत असेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादीच्या खासदार माजी शहराध्यक्षा वंदना चव्हाण सध्या दिल्लीत असून त्यांना ही वार्ता समजताच त्यांनी त्याबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे. राज्यात दुष्काळाची परिस्थिती असताना सेलेब्रिटीला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवायचे व त्यासाठी पाच लाख रूपये मोजायचे यासाठीचा  आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह पाहन आपण थक्क झालो आहोत असे सांगतानाच त्यांनी हा प्रकार पक्षाच्या हाय कमांडपर्यंत नेणार असल्याचेही सूतोवाच केले आहे.

Leave a Comment