शाहरुख स्टार नाही – गोविंदा

९० च्या दशकात अक्टिंगच्या जोरावर इंडस्ट्रीमध्ये सुपरस्टार अशी ओळख निर्माण करणाऱ्या गोविंदाच्या मते शाहरुख खान हा स्टार कलाकार नाही. सद्यस्थितीत सलमान खान, अक्षय कुमार व अजय देवगण हे स्टार आहेत. सगळ्यात मोठा स्टार मि. पर्फेक्शनिस्ट अमीर खान आहे. सलमान, अक्षय व अजयचे फॅन्स त्यांच्याशी इमानदार असल्याचा फायदा त्यांना त्यांची क्रेझ संभाळण्यासाठी होत आहे.

गोविंदाच्या मते, शाहरुख आणि अमीरचे फॅन्स थोडेसे टॅलेंटेड असून वेळ व प्रत्येक सिनेमानुसार ते बदलत असतात. सध्या हिंदी सिनेमात स्टार कल्चर वाढत आहे. एक दोन हिट चित्रपट दिल्यानंतर हिरो लगेच स्टार होतो. रितिक रोशनने कहो ना प्यार है हा एकाच हिट चित्रपट दिला आणि तो लगेचच स्टार झाला. त्यानंतर त्याच्यामध्ये आवश्यक ते बदल घडवून त्याने स्टारडम टिकवून ठेवले आहे.

शाहरुखचे मात्र तसे नाही. तो सिनीयर झाला असल्याने वयानुसार भूमिका स्वीकारणे आवश्यक असून या वयात लवर बॉय अथवा कॉलेजियन्सची भूमिका त्याला सूट होणार नाही. त्याने आगामी काळात असले रोल नाकारून करियरवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, तरच तो यशस्वी होईल. असा सल्ला यावेळी गोविंदाने किंग खानला न विसरता दिला.

Leave a Comment