नवी कॅम्री २४ ऑगस्टला बाजारात

पुणे दि.६ – टोयाटो किर्लोस्कर मोटर्सची नवी प्रिमियर लक्झरी कार कॅम्री २४ ऑगस्टला बाजारात येत असून या कारची असेंब्ली कंपनीच्या बंगलोर येथील असेंब्ली प्रकल्पात करण्यात आली आहे. नवी दिल्लीत ही कॅम्री लाँच केली जाणार आहे.
 
कंपनीचे उपव्यवस्थापकीय संचालक संदिप सिग याविषयी अधिक माहिती देताना म्हणाले की जपानची टोयाटो आणि भारतीय किलोस्कर मोटर्स यांच्या भागीदारातून निर्माण झालेल्या टोयाटो किलोस्कर मोटर्सकडे  बंगलोर प्रकल्पात पुरेशी जागा आहे. या गाडीचे सुटे भाग आयात करण्यात आले आहेत. कंपनीने पहिल्यांदा भारतीय बाजारात सादर केलेली कॅम्री जपानमध्येच पूर्ण असेंबल करण्यात आली होती. टोयाटोच्या जगात विकल्या जाणार्‍या सर्वाधिक कार पैकी कॅम्री ही कार आहे.

टोयाटो किलोस्कर मोटर्सची देशात दोन उत्पादन सुविधा केंद्रे असून या दोन्ही केंद्राची ३ लाख युनिट निर्मिती क्षमता आहे. पैकी पहिल्या प्रकल्पात इनोव्हा, फॉरच्युनर या गाड्या तयार होतात तर दुसर्‍या प्रकल्पात इटिऑस, इटिऑस लिवा, करोला अल्टीस या गाड्या तयार केल्या जातात. कंपनीच्या उत्पादनांची विक्री मंदीच्या पार्श्वभूमीवरही चांगली होत असून या वर्षात १,७० हजार गाड्या विकण्याचे उदिष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच कंपनीच्या बंगलोर येथील प्रस्तावित इंजिन प्रकल्पातही या महिन्यापासून उत्पादन सुरू होत असल्याचेही सिंग यांनी सांगितले.

Leave a Comment