’हीरोईन’ला यूट्यूबवर मिळाले २० लाख प्रेक्षक

नवी दिल्ली, ३ ऑगस्ट-अभिनेत्री करीना कपूरच्या बहुप्रतीक्षित ’हीरोइन’ चित्रपटाचे पहिले ट्रेलर यू-ट्यूबवर २० लाख प्रेक्षकांनी पाहिले. याचित्रपटाचे ट्रेलर २५ जुलै रोजी छोट्या पडद्यावर आणि इंटरनेटवर एकाचवेळी प्रसिद्ध करण्यात आले होते. प्रेक्षकांचीही चांगली प्रतिक्रिया मिळाल्याने मधुर भंडारकर खूप खुश दिसत आहे.

मधुरने एका वक्तव्यात म्हटले की, मी ट्रेलरला मिळालेल्या चांगल्या प्रतिक्रियेमुळे खूप आनंदी आहे. ही फक्त सुरूवात आहे. या चित्रपटात करीना माही अरोत्रडा नामक अभिनेत्रीची भूमिका साकारत आहे. त्यासाठी चित्रपट कलावंताच्या जीवनातील चढ-उतार सादर करण्याचा प्रयत्नकरण्यात आला आहे.

चित्रपटाच्या सुरूवातीच्या भागात एका अभिनेत्रीच्या जीवनातील प्रत्येक पैलू, तिचा संघर्ष, सफलता, असफलता दाखविण्यात आली आहे. यात बहुतांश दृश्यात करीना खूप आकर्षक दिसत आहे. ट्रेलरमध्ये करीनाचे आयटम नंबर हलकट जवानीचे दृश्यही समाविष्ट करण्यात आले आहे. यूटीवी मोशन पिक्चरचा हीरोइन २१ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होईल.

आपण खाली या चित्रपटाचे ट्रेलर पाहू शकतात.

Leave a Comment