रंगाच्या जाहिरातीसाठी कतरिनाला सात कोटी

 चित्रपटासाठी कोण किती रक्कम घेते ही चर्चा बॉलिवूडमध्ये नेहमीच होत असते. मात्र आता बॉलिवूड कलाकारांनी जाहिरातींसाठीही एकमेकांत स्पर्धा लावल्याचे चित्र सध्या दिसत असून कतरिना कैफ हिने पेंट्सच्या जाहिरातीसाठी तब्बल सात कोटी रूपये मानधन घेतले असल्याचे समजते. यापूर्वी करिनाने पाच कोटी तसेच दीपिका पदुकोण हिनेही हेअर ऑईलच्या जाहिरातीसाठी पाच कोटी घेऊन रेकॉर्ड केले होते आता कतरिनाने या दोघींनाही मागे टाकत जाहिरातीसाठी सर्वात अधिक मानधन घेऊन नवीन रेकॉर्ड प्रस्थापित केले आहे.

विशेष म्हणजे याच रंगाच्या जाहिरातीसाठी पूर्वी शाहरूख खान यानेही काम केले आहे. मात्र त्यालाही जाहिरातीसाठी इतकी मोठी रक्कम दिली गेली नव्हती असेही समजते.

Leave a Comment