सॅमसंग गॅलॅक्सी नोट सिक्वेल ऑगस्टला बाजारात

सेऊल दि.३ – सॅमसंग इलेक्ट्रोनिक्सने त्यांच्या लोकप्रिय गॅलॅक्सी नोट स्मार्ट सिक्वेलचे लॉचिंग २९ ऑगस्टलाच होत असल्याचे जाहीर केले असून हे लॉचिंग जर्मनीच्या बर्लिन येथे करण्यात येत आहे. विशेष म्हणजे त्याची प्रतिस्पर्धी कंपनी अॅपलचा नवीन आयफोन बाजारात येण्याअगोदर तब्बल १५ दिवस हे लॉचिंग केले जात असून अॅपलवर सॅमसंगने केलेली ही कुरघोडी असल्याचे जाणकार सांगत आहेत. अॅपलने त्यांच्या स्मार्टफोनची कॉपी सॅमसंगने केल्याचा आरोप केला असून त्याविषयीचा पेटंट वाद सध्या सुरू असतानाच या नव्या स्पर्धेलाही तोंड फुटले आहे.

सॅमसंगच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार सॅमसंग गॅलॅक्सी नोट सिक्वेलचे उद्घाटन युरोपच्या सर्वात मोठ्या कझ्युमर इलेक्टॉनिक्स ट्रेड फेअरच्या अगोदर दोन दिवस केले जात आहे. ही फेअर ३१ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. नवीन नोट साडेपाच इंचाचा अनब्रेकेबल स्क्रीन, अधिक वेगवान प्रोसेसर आणि अधिक चांगल्या प्रतीचा कॅमेरा या वैशिष्टांसह असेल असे सांगितले जात आहे.

गॅलेक्सी एस थ्रीने एप्रिल ते जून या तीन महिन्यात ५० दशलक्षांहून अधिक ग्राहक मिळविले आहेत तर तुलनेत अॅपलला २६ दशलक्ष ग्राहकांनाच आकर्षून घेण्यात यश आले आहे. म्हणजे सॅमसंगने अॅपलवर विक्रीच्या बाबतीच चांगलीच आघाडी घेतलेली आहे.

Leave a Comment