आमिरची शॉपिंग धूम – २२ घरे खरेदी

सत्यमेव जयतेचे शूट संपल्यानंतर अमीर खान आता शॉपिंगच्या मुडमध्ये दिसत आहे. दोनच दिवसापूर्वी अमीर खानने शम्मी कपूरचे जाकेट खरेदी केले होते. त्यानंतर आता त्याने उत्तर प्रदेशमध्ये एकदम २२ घरे खरेदी केली असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.

आमिरने उत्तर प्रदेशातील शाहबाद जिल्ह्यात २२ घरे खरेदी केली आहेत. ही सर्व घरे त्याचे अंकल नसीर हुसेन आणि त्याच्या भावाची असल्याचे समजते. शाहबाद जिल्ह्यात अमिर खानच्या पुर्वाजाच्या नावे खूप वर्षापासूनची प्रापर्टी आहे. अमीरची ही नातेवाईक मंडळी त्यांच्या पूर्वजांची प्रापर्टी खूप जुनी झाली असल्याने विकण्याचा विचार करीत होते. आपली पूर्वजांची प्रापर्टी दुसऱ्या कुणी खरेदी करू नये या उद्धेशाने भावाशी चर्चा करून ती सर्व २२ घरे आमिरनेच खरेदी केली.

नव्याने खरेदी केलेली ही २२ घरे आमिरने स्वतःच्या नावावर न करता त्याचा भाऊ फैसल व बहिण फरहात यांच्या नावे केली असल्याचे समजते.

Leave a Comment