माजी सरसंघचालक के. सी. सुदर्शन हरवले – सापडले

म्हैसूर दि ३ – माजी सरसंघचालक सुदर्शन याचा शोध लागला असून ललित महाल हेलिपॅड जवळच्या रस्त्यावर ते एकटेच बसल्याचे आढळून आले. ८१ वर्षीय सुदर्शन घरचा रस्ता विसरले होते. आता ते सुखरूप घरी पोहोचले आहेत. गुरुवारी पहाटे फिरण्यासाठी बाहेर पडलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक कुप्प सी सुदर्शन बेपत्ता झाले असल्याची तक्रार त्यांच्या भावाने याबाबत तक्रार केली होती.

सुदर्शन हे म्हैसूर येथे आपल्या भावाकडे गेले होते. नेहेमीच्या सवयीनुसार पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास ते फिरण्यासाठी बाहेर पडले. त्यावेळी अंगरक्षकही त्यांच्या बरोबर नव्हता अथवा मोबाईल फोनही त्यांनी बरोबर घेतला नव्हता. सुदर्शन तीन तास उलटूनही घरी न परतल्याने त्यांच्या भावाने व कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला. मात्र ते न सापडल्याने त्यांनी पोलिसांकडे तक्रार होती आणि पोलिसांनी त्वरित शोध सुरू केला होता.

Leave a Comment