नित्यानंदचा परदेशी परागंदा होण्याचा डाव फसला

नवी दिल्ली: अध्यात्माच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करणारा स्वामी नित्यानंद आपली प्रेयसी दाक्षिणात्य अभिनेत्री रंजिता हिला घेउन परदेशात पळून जाण्याच्या प्रयत्नात होता; अशी माहिती नुकतीच पुढे आली आहे.

नित्यानंद सध्या नेपाळमध्ये आहे. त्याचा आणि रंजीताचा पासपोर्ट नितीन कौशिक याच्याकडून दिल्ली विमानतळावर हस्तगत करण्यात आले. त्याच्याकडे नित्यानंदाच्या आणखी ३२ भक्तांचे पासपोर्टही मिळाले. हे सर्व पासपोर्ट कस्टम विभागाने जप्त केले आहेत.

नितीन हा बड्या ग्राहकांना परदेशवारी आणि सहलींच्या आयोजनाचा व्यवसाय कराव. त्याच्यामार्फत रंजितासह परदेशात पळून जाण्याचा नित्यानंदचा डाव होता.