’टायगर’च्या यशासाठी अजरमेर दरगाहला ’कॅट’चे साकडे

जयपुर,३ ऑगस्ट-आताच बॉलीवुड सेलिब्रिटीजचे आपल्या चित्रपटाच्या यशावरून अजमेर दरगाहमध्ये दर्शन करणे व आपल्या चित्रपटांची सीडी पाठवण्यावर खुप बवाल केला होता आणि म्हटले होते की, आतापासून कोणत्याही बॉलीवुड सेलिब्रिटीला अजमेर दरगाहवर येण्यावर रोख लावली जावी.

या घटनेनंतर बुधवारी १ ऑगस्टला कॅटरीना कैफ अजमेर दरगाहमध्ये दिसली ते देखील काळ्या रंगाच्या सलवार कमीज व ओढणीसह. दरगाहमध्ये उपस्थित खादिम कुतुबुद्दीन सिद्दीकीने सांगितले, ’सध्या रमजान सुरू आहे, यामुळे दरगाहमध्ये लोकांची गर्दी जमली आहे. कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये यामुळे कॅटरीना खुप सकाळीच दरगाहमध्ये दर्शन करण्यासाठी आली होती. ती सुमारे अर्ध्या तासापर्यंत येथे राहिली आणि तिने आपली मनोकामनेचा दोरा जो मागच्या वेळी बांधला होता तो काढुन घेतला.’

दरम्यान जेव्हा छायाचित्रकारांनी तिचे छायाचित्र घेण्याची इच्छा वर्तवली तेव्हा तिने मोठ्या शालीनतेने नकार दिला. कॅटरीना कैफ मंगळवारी ३१ जुलैला जयपुरला पोहचली होती. सुत्रानुसार कॅट जयपुर-दिल्ली हायवेवर स्थित एक खुप मोठ्या रिसोर्टमध्ये एक जाहिरातीची शूटिंग करीत आहे.

दरगाहच्या हेडद्वारे बॉलीवुडच्या सेलिब्रिटीसच्या दरगाहवर येऊन आपल्या चित्रपटाची मनोकामना मागण्यावरून आपली नाराजी वर्तवल्यानंतर कॅटरीना कैफ ती पहिली कलाकार आहे जी दरगाहच्या दारावर दिसली. आता हे तर स्पष्ट झाले की, मनाई करूनही कैट जर अजमेर दरगाहला गेली होती तर विशेष काही मागण्यासाठीच गेली असेल.’एक था टायगर’ चे यश किंवा शक्यतो ’टाईगर’ ची सुखरूपता!

Leave a Comment