नव्या राजकीय पक्षाच्या स्थापनेला अण्णांचा पाठिंबा

नवी दिल्ली, ३ ऑगस्ट-टीम अण्णा राजकारणात उतरणार, असे चित्र आता निर्माण झाले आहे. स्वतः अण्णांनीच त्यासंबंधीचे संकेत दिले आहेत. अर्थात अण्णांनी मी स्वतः कोणताही पक्ष स्थापन करणार नाही किंवा निवडणूक लढवणार नाही, असे सांगितले आहे. परंतु मात्र नवा राजकीय पर्याय तयार होत असेल, तर मी समर्थन देईन, असेही म्हटले आहे.

हा नवा पर्याय टीम अण्णा असू शकते, असे स्पष्ट संकेत अण्णांनी जंतरमंतरवरुन केलेल्या भाषणातून मिळाला.

टीम अण्णांच्या राजकीय प्रवासाचे सूतोवाच गुरुवारी ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांच्या भाषणातून झाले.टीम अण्णांनी देशाला राजकीय पर्याय द्यावा अशी मागणी करणारं निवेदनच त्यांनी स्टेजवर वाचून दाखवले. माजी निवडणूक आयुत्त* जे.एम.लिंगडोह, माजी लष्करप्रमुख व्ही.के.सिंग, वरिष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांच्यासह अनेक मान्यवरांनी या निवेदनावर सह्या केल्या आहेत.

जंतरमंतरवर अनुपम खेर यांच्या वत्त*व्यानंतर टाळ्यांच्या कडकडाटात उपस्थितांनी या सूचनेचे स्वागत केले.

काँग्रेसने सुरुवातीपासून अण्णांचे आंदोलन भाजपप्रणित असल्याचे आरोप केले. त्यासाठी अण्णांचा संबंध राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशीही जोडण्यात आला. अनुपम खेर यांच्या वत्त*व्यानंतर राजकीय पक्षांकडून टीम अण्णांवर जोरदार हल्ला केला गेला. काँग्रेसनं तर हे आंदोलन म्हणजे राजकारणात येण्यासाठीचाच बनाव होता असे म्हटलेही आहे.

राजकारणापासून अलिप्त राहूनच अण्णा आजवर सरकारच्या विरोधात लढले. थेट मैदानात या असे आव्हानही अनेक राजकीय नेत्यांनी त्यांना दिले. मात्र आपण राजकारणात पडणार नाही असेच अण्णा सांगत राहिले. आता मात्र त्यांना हाच पर्याय योग्य वाटत आहे.

Leave a Comment