सनी देओल करणार डबल रोल

आतापर्यंतच्या बॉलीवूडच्या कारकीर्दीत पहिल्यांदाच सनी देओल डबल रोल करणार आहे. सनी भइयाजी सुपरहिट या चित्रपटात डबल रोल करणार आहे. या चित्रपटात तो एकीकडे बनारसी डॉनची भूमिका करीत आहे तर दुसरीकडे पंजाबमधून आलेल्या एका अभिनेत्याची भूमिका साकारणार आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन नीरज पाठक यांनी केले आहे. नीरजने यापूर्वी राइट राँग या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा येणारा चित्रपट धमाका व कॉमेडी याचे दुहेरी मिश्रण असणारा आहे. यामध्ये सनीसोबतच अर्शद वारसी, श्रेयस तळपदे आणि मिथुन चक्रवती आणि प्रकाश राज यांची प्रमुख भूमिका असणार आहे. अभिनेत्री म्हणून प्रीती झिंटासोबत त्यांचे बोलणे सुरु आहे. तिने जर होकार दर्शविला तर वर्षाअखेरीस या चित्रपटाचे शूट सुरु होईल.
या चित्रपटात सनीची भूमिका थोडीसी वेगळ्या धाटणीचे असणार आहे. यामध्ये सनीचा लूक वेगळा असणार असून त्यासाठी त्याने मिशा वाढविल्या आहेत. याशिवाय कपळावर गंधाचा टिळा व हातावर टॅटू काढले आहे. सनी डबल रोल करीत असलेला हा पहिलाच चित्रपट असल्याने त्याच्या या चित्रपटातील अभिनयाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Comment