ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये फिक्सिंग

लंडन,दि.२ – लंडन ऑलिम्पिक स्पर्धेस मॅच फिक्सिंगचा काळिमा लागला आहे. या मॅच फिक्सिंग प्रकरणी बॅडमिंटन स्पर्धेतील आठ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये चीनच्या दोन महिला खेळाडू, इंडोनेशियाच्या दोन महिला खेळाडू आणि दक्षिण कोरियाच्या चार खेळाडूंना समावेश आहे.

या सर्वांना ऑलिम्पिक स्पर्धेतून बाहेर काढण्यात आले. बॅडमिंटनमधील अव्वल मानंकित चिनी संघाशी खेळणे टाळण्यासाठी दक्षिण कोरिया आणि इंडोनेशियाच्या महिला बॅडमिंटनपटूंनी आपल्या कामगिरीला साजेसा खेळ केला नाही, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.