छोट्या दोस्तांसाठी `डिस्कव्हरी किडस्’

डिस्कव्हरी छोट्या प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे एक नवे चॅनल…
नुकतीच ’डिस्कव्हरी नेटवर्क एशिया पॅसिफिक’ने लहान मुलांसाठी एक नवे चॅनल सुरू करण्याची घोषणा केली आहे. या चॅनलचे नाव असेल ’डिस्कव्हरी किडस्’.

४ ते ११ वर्षांच्या मुलांची मानसिकता लक्षात घेऊन या चॅनलवर कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. २४ तास सुरू असणारं हे चॅनल इंग्रजी, हिंदी आणि तमिळ भाषेत उपलब्ध होईल. मुलांमध्ये गुणवत्तापूर्ण श्रेणीची कमतरता हे चॅनल पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. पुढच्या आठवड्यापासून या चॅनलच्या वेबसाईटची सुरूवात होणार आहे.

भारतात १९९५ पासून डिस्कव्हरी चॅनलची सुरूवात झाली आहे. ३७ करोड मुलांसाठी फक्त ५-६ चॅनल्स उपलब्ध आहे. त्यामुळे या क्षेत्रात जास्त संधी असल्याचे डिस्कव्हरी नेटवर्क एशिया पॅसिफिकला वाटत आहे. याच कंपनीची टीएलसी आणि ऍनिमल प्लॅनेट या नावाची आणखी दोन चॅनल्सचे प्रसारण भारतात सुरू आहे.

Leave a Comment