आलिया भट्टची रुपेरी पडद्यावर एन्ट्री

प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट यांची कन्या आलिया भट्ट लवकरच बॉलीवूडमध्ये एन्ट्री करित आहे. ती करण जोहरच्या स्टुडट ऑफ द इयर या चित्रपटातून प्रदार्पण करणार आहे. आलियाने लहानपणापासून चित्रपटात अभिनय करण्याचे ठरविले होते. पण तिचे गेल्या काही दिवसापासून वाढलेले वजन मात्र तिच्या या स्वप्नामध्ये अडथळा ठरत होते. मात्र करणने तिच्या या चित्रपटासाठी १०० मुलीमधून १० मुलीची निवड केली होती त्यामध्ये अलीयाचा क्रमांक होता.

आलियाचे वजन जास्त असल्याने पहिल्यांदा करणने तिला वजन कमी करण्याचा सल्ला दिला होता. वजन कमी केल्यानंतरच या चित्रपटातील प्रमुख नायिकेची भूमिका तिला मिळणार होती. करनचे बोलणे मनावर घेऊन तिने ३ महिन्यात तिचे वजन १६ किलोने कमी केले. वजन कमी केल्याने आलिया आता सुंदर व स्लिम दिसू लागली आहे. त्यामुळे करणने तिची आता या चित्रपटाची नायिका म्हणून निवड केली आहे. या चित्रपटाचे शुटींग लवकरच सुरु होणार आहे. या चित्रपटात नायिका म्हणून आता आलिया काय कमाल दाखविणार हे लवकरच समजेल.

Leave a Comment