सलमानमुळे रखडले धूम-३ चे शुटींग

सलमान खान जे ठरवितो ते तो करून दाखवतोच या अनुभवाची प्रचीती पुन्हा एकदा आली आहे.मात्र यावेळी ती चांगल्या कारणासाठी नाही. सलमान मुळे मिस्टर परफेक्शनिस्ट अमीर खानच्या धूम-३ चे चित्रीकरण काही दिवसापासून रखडले आहे अशी वार्ता आहे.

सलमानचा एक था टायगर चित्रपट १५ ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनचे काम सध्या धुमधडाक्यात सुरु आहे. प्रमोशनसाठी सलमानला कैटरीना सोबत हवी आहे. धूम-३ च्या शुटींगसाठी कैटरीना शिकागोला जाणार होती. मात्र सलमानने तिला भारतातच थांबवून घेतले आहे. परिणामी सध्या धूम-३ चे चित्रीकरण रखडले आहे.

धूम-३ चित्रपटात कैतरिना अमीर खान सोबत प्रमुख भूमिका करीत आहे. कैटरीना शिकागोला पोहोचलीच नसल्यामुळे आमिरला शुटींग थांबवावे लागले आहे. १५ ऑगस्टनंतर एक था टायगर रिलीज झाल्यानंतर ती शिकागोला जाणार असल्याची माहिती सूत्राने दिली आहे. त्यामुळे धूम-३ या चित्रपटाचे चित्रीकरण १५ दिवसासाठी रखडणार आहे.

Leave a Comment