मल्लिका आणि विवेकमध्ये तु तु मै मै

मल्लिका शेरावत हॉलीवुड गाजवून बॉलिवूडमध्ये परतली आहे. मात्र हॉलीवुडचे भूत तिच्या मानेवरून काही केल्या उतरायला तयार नाही. नुकताच बॉलीवूडमधील चित्रपटाच्या फर्स्ट लूक लॉच वेळीं ती हॉलीवूडमधील चित्रपटाचे गुणगान गाताना दिसत होती.

मल्लिका व विवेक ओबेरॉय यांचा किस्मत, लव, पैसा, दिल्ली हा चित्रपट येत आहे. मल्लिकाला वाटत होते की, किस्मत, लव, पैसा, दिल्ली या चित्रपटाचा फर्स्ट लूक लॉच कान महोत्सवाप्रसंगी रिलीज करायला हवा होता. हा चित्रपट युवा पिढीसाठी असल्याने त्या ठीकाणी या चित्रपटाला खूप प्रसिद्धी मिळाली असती. मात्र विवेकाला तिचे म्हणणे काही आवडले नाही. मल्लिकाच्या मतास विरोध करताना विवेक म्हणाला की, मी एक देशी हिरो आहे. हे मी कधीच विसरत नाही. हा चित्रपट दिल्लीवर आधारित असल्याने या चित्रपटाला भारताशिवाय इतरत्र कुठेच जास्त प्रेक्षक वर्ग मिळणार नाही याची कल्पना मला आहे. त्यामुळे हा चित्रपट कान महोत्सवात घेऊन जाण्याची काही गरज नव्हती.

विवेकने इतक्या स्पष्ट शब्दात बजावल्यामुळे मल्लिकाची मात्र चांगलीच पंचाइत झाली. सेटवर उपस्थित असलेल्या त्यांच्या इतर सहकाऱ्यांची मात्र या तु तु मै मै मुळे मात्र चांगलीच करमणूक झाली.

Leave a Comment