लंडन: शनीचा चंद्र असलेल्या इपीटस च्या पृष्ठभागावर होणाऱ्या हिमस्खलनावरून पृथ्वीवरील विनाशकारी भूस्खलनाची माहिती आता मिळू शकेल; असा दावा संशोधकांनी केला आहे. केसिनी मिशनद्वारे मिळालेल्या काही चित्रफितींचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

या चित्रिकरणावरून तेथील विशेष पर्वत शृंखलांच्या हिमस्खलनाचे विश्लेषण संशोधकांनी केले आहे. काही ठिकाणी हिमस्खलन ५० मैलांपर्यंत झालेले आहे. संशोधकांचे म्हणणे आहे की; या इपीटसवरील लांब पर्यंत झालेल्या हिमस्खलनाची कारणे शोधून त्यावरून पृथ्वीवरील विनाशकारी हिमस्खलनाची माहिती मिळू शकते. शनीच्या चंद्राभोवती बर्फाचे वर्तुळाकार कडे केलेला १२ मैलांहून जास्त उंच रहस्यमय बर्फाच्छादित किनारा आहे. एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत याची लांबी जवळ जवळ एक हजार मैल इतकी आहे. इपीटसवरील या विशाल पर्वत शृंखलांचा शोध अमेरिकेची अंतरीक्ष संस्था नासाने २००४ मध्ये केसिनी अंतराळयानाद्वारे लावला आहे.
सेंट लुईस येथील वाशिंगटन युनिवर्सिटीचे वैज्ञानिक केलसी सिंगेर यांनी सांगितले की; शनीच्या चंद्रावरील आत्यंतिक थंड व वायुविहीन पृष्ठभागावरील भूस्खलन ही पृथ्वीवरील भूस्खलनाच्या अभ्यासासाठी चांगली प्रयोगशाळा ठरणार आहे.