दीपिका घेणार ब्रेक

बॉलीवूडमधील सर्वात बीझी अभिनेत्री म्हणून दीपिका पदुकोण हिचे नाव घेतले जात आहे. मात्र या बिझी शेड्यूल मुळे दीपिकाला आजारपण आले आहे. कामाच्या व्यापात आरोग्याची काळजी घेण्यासाठी तिला वेळ मिळत नाही. परिणामी काम थोडे थांबवून तिने काही काळ ब्रेक घेण्याचे ठरविले आहे. सध्या ती बेंगलोरमध्ये जाऊन सुट्टी शांतपणे एन्जॉय करण्याचा विचार करीत आहे.

जवानी दिवानी चित्रपटाचे शुटींग करीत असताना दीपिकाला अचानक थकवा जाणवू लागला होता. त्यामुळे तिने डॉक्टरकडून तपासणी करून घेतली. त्यावेळी डॉक्टरांनी तिला कमीत कमी पाच दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. डॉक्टरांचा सल्ला दीपिकाने ऐकला आहे असे समजते. या वृतास तिच्या सल्लागाराने ही दुजोरा दिला आहे.

थोडी विश्रांती घे असे दीपिकाचे पालकांही सांगत होते, मात्र दीपिकाने त्याकडे फारसे गांभिर्याने पहिले नव्हते. गेले काही दिवस ती आर्यन मुखर्जीच्या चित्रपटसाठी ११ ते १२ तास काम करते आहे. तसेच कॉकटेल चित्रपटाच्या प्रमोशनच्या कामातही ती व्यस्त आहे. त्यामुळेच आता आजारपणामुळे का होइना काही दिवस दीपिकाला सुट्टी घ्यावी लागत आहे.

Leave a Comment