स्मार्टफोन तयार करण्याचा विचार नाही – मार्क झुकेरबर्ग

फेसबुक बेस्ड स्मार्टफोन तयार करण्याचा कंपनीचा कोणताही विचार नाही असे फेसबुकचा संस्थापक आणि इंटरनेट उद्योजक मार्क झुकेरबर्ग याने स्पष्ट केले आहे. फेसबुक अॅक्सेससाठी संपूर्ण स्मार्टफोन बनविण्यात आम्हाला सध्या तरी कांही फायदा दिसत नाही असे सांगताना तो म्हणाला की आमची सोशल साईट कोणत्याही स्मार्टफोन अॅपवरून अॅक्सेस करता येत असल्याचे आमचा स्वतःचा फोन हवाच असे नाही.

अतिशय वेगाने लोकप्रिय झालेल्या फेसबुक या सोशल साईटची ग्राहक संख्या अल्प काळात ५४० दशलक्षवरून ९७५ दशलक्षांवर पोहोचली आहे. दिवसेनदिवस ही संख्या वाढतच चालली आहे. मे २०१२ त फेसबुकचा आयपीओ आला असून त्याविषयी गुंतवणूकदारांशी कॉन्फरन्स कॉलच्या माध्यमातून बोलताना झुकेरबर्गने वरील माहिती दिली आहे. अर्थात फेसबुक आयपीओ गुंतवणूकदारांना या काळात १०० दशलक्ष डॉलर्सचे नुकसान झाल्याचे मार्कने मान्य केले आहे. परिणामी गुंतवणूकदार ही सोशल वेबसाईट किती महसूल गोळा करू शकेल याबाबत चिंतेत आहेत. मात्र आयपीओ मधून अपेक्षेपेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात पैसा फेसबुकला मिळाला असल्याचे तज्ञ सांगत आहेत.

Leave a Comment