माझ्याच कामाचा उरक अधिक : मुख्यमंत्र्यांचा दावा

मुंबई: माझ्या आधीच्या चार मुख्यमंत्र्यांच्या तुलनेत माझ्या कामाचा उरक अधिक असल्याचा दावा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी स्वत:लाच कार्यक्षमतेचे प्रशस्तीपत्र देऊन टाकले.

मुख्यमंत्र्यांकडून कामे होत नसल्याची तक्रार सत्तेत सहयोगी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कोंग्रेसच्या मंत्री आणि आमदार यांच्या बरोबरच मुख्यमंत्र्यांचे स्वपक्षीय आमदारही करीत असतात. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी हे सूचक विधान केले आहे.

आपल्या विधानाच्या समर्थनार्थ चव्हाण यांनी आपण मागील चार मुख्यमंत्र्यांपेक्षा जास्त फ़ाईल्स क्लीअर केल्याचा दावा केला आहे.

Leave a Comment