दर्डांची कोलांटी उडी

अहमदाबाद: गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी ‘वाघ’ आणि ‘संत’ या विशेषणांनी कौतुक करणे काँग्रेस खासदार विजय दर्डा यांच्यावर शेकत असल्याचे पाहून दर्डा यांनी कोलांटी उडी मारली आहे. काँग्रेस पक्षाकडून दर्डा यांची कानउघाडणी होताच दर्डा यांनी आपल्या विधानांचे स्पष्टीकरण दिले आहे.

रविवारी मोदी यांच्याबरोबर एकाच व्यासपीठावर येऊन दर्डा यांनी मोदींची भलामण केली होती. मात्र मोदी हे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला न जुमानता आपली मते आणि निर्णय त्यांच्या माथी मारू शकतात म्हणून आपण त्यांना वाघाची उपमा दिल्याचे स्पष्टीकरण दर्डा यांनी आपल्या निवेदनात दिले आहे. आपण मोदी यांचा उल्लेख राष्ट्रीय संत असा नव्हे तर राजकीय संत असा केल्याचा खुलासाही दर्डा यांनी केला.

गुजरातमध्ये सन २००२ मध्ये झालेल्या नृशंस हत्याकांडाचे आपण टीकाकार असून राज्यसभेत आणि इतर व्यासपीठांवरही आपण त्याचा धिक्कारच केल्याकडे दर्डा यांनी लक्ष वेधले.

Leave a Comment