चुलत बहिण-भाऊ सिनेमासाठी एकत्र येणार

  करीना कपूर आणि रणबीर कपूर या दोन झळाळत्या स्टार्सना एकत्र पाहण्याची इच्छा अनेकांना आहे. पण, खर्‍याखुर्‍या लाईफमध्ये चुलत बहिण-भाऊ असलेल्या या दोघांनीही आपण कधीही एकत्र रोमांटीक भूमिका करणार नसल्याचे सांगितले.

करिना आणि रणबीर करणार असलेला हा सिनेमा बहिण-भावाच्या संबंधांवर आधारित आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हा सिनेमा खर्‍याखुर्‍या भावा-बहिणीच्या म्हणजेच फरहान अख्तर आणि झोया अख्तर यांच्याच जीवनावर आधारित आहे.

दिग्दर्शक झोया अख्तर हिने ही किमया साधली आहे. तिने दोघांनाही एकत्र काम करायला भाग पाडले आहे. चुलत भाऊ-बहिण असलेले करीना आणि रणबीर झोयाच्या फिल्ममध्येही भावा-बहिणीच भूमिका साकारणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, ’तलाश’ फिल्मच्या शुटींगच्या वेळी झोयाने या तिच्या आगामी प्रोजेक्टची कथा करीनाला ऐकवली. करीनाला ही कथा इतकी आवडली की तिने लागलीच या भूमिकेसाठी हो म्हटले. आता प्रश्‍न होता भावाच्या भूमिकेचा आणि झोयाच्या नजरेसमोर पहिल्यांदा रणबीर आला. तिने ही कथा रणबीरलाही ऐकवली आणि महत्त्वाचे म्हणजे रणबीरलाही त्याची भूमिका खूपच पसंत पडली. त्यानेही होकार दिला. आणि दोघंही आता या सिनेमाचे शुटींग कधी सुरू होणार याची वाट पाहत आहेत.

Leave a Comment