मी ९० वर्षापर्यंत काम करणार – करीना

मधुर भंडारकरचा बहुप्रतीक्षित चित्रपट ’हीरोइन’ मध्ये करीना सुपरस्टारची भूमिका निभावीत आहे. हा चित्रपट २१ सप्टेंबरला प्रदर्शित केला जाईल. योगायोगाने यादिवशी करीनाचा वाढदिवस आहे. तिने सांगितले, `मी ९० वर्षापर्यंत काम करीत राहील.’ ही उल्लेखनीय बाब आहे.

चित्रपटात एक अभिनेत्रीचे संभ्रांत उच्च जीवनापर्यंत पोहोचण्याचा इतिहास व त्याची दु:खद शेवटाची कथा दाखवण्यात आली आहे. करीना कपूरने आपला आगामी चित्रपट ’हीरोइन’ व विद्या बालनचा चित्रपट `द डर्टी पिक्चर’ मध्ये समानता असण्यावर नकार दिला.

बॉलीवुड अभिनेत्री करीना कपूरने म्हटले, ’मी दुसर्‍याचे बुट घालणार नाही. मी आपल्या बुटात खुप आनंदी आहे आणि माझे बुट एखाद्या इतराच्या पायात ठीक असणार नाही. मी कोठेही जाणार नाही. ’हीरोइन’ एखादा खराब चित्रपट नसून हा ’द डर्टी पिक्चर’ पेक्षा अगदी वेगळा आहे. दोन चित्रपटांची तुलना करणे ठीक नाही.’ 

’द डर्टी पिक्चर’ ८० च्या दशकाची कथा आहे तसेच ’हीरोइन’ आजच्या समाजावर आधारित आहे. ’द डर्टी पिक्चर’ एक आयटम गर्लची कथा आहे, तसेच ’हीरोइन’ एक सुपरस्टारवर आधारित आहे. मी या चित्रपटाची पटकथा दुसर्‍या चित्रपटांनी वेगळे असल्यामुळे करीत आहे. मला वाटत आहे की, दोन्ही चित्रपटांची आपसात तुलना करणे ठीक नाही कारण हे चुकीचे आहे.‘ तसेच करीनाने ’हीरोइन’ चित्रपटात एक आयटम सॉंग ’हलकट जवानी’ देखील दिली; परंतु तिचे म्हणणे आहे की, हे कॅटरीना कैफचे आयटम सॉंग `शीला की जवानी’ चे उत्तर नाही. करीनाने म्हटले, ’हे कुणलाही दिलेले उत्तर नाही आणि याने एखाद्याची तुलना करू नका हे माझे आहे.’

’हिरोइन’चे दिग्दर्शक मधुर भंडारकरने करीनाच्या अभिनयाची स्तुती करून सांगितले,’करीनाने चांगले काम केले आहे आणि मला पूर्ण विश्‍वास व अपेक्षा आहे की, तिला या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळेल.’

Leave a Comment