पटना: आकाशाला गवसणी घालणारया महागाईला आळा घालण्यात पंतप्रधान मनमोहन सिंग आणि त्यांच्या सरकारला अपयश आल्याचा आरोप राज्यसभेतील उपनेते आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार रविशंकर प्रसाद यांनी केला. देश दुष्काळसदृश परिस्थितीला सामोरा जात असताना जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ रोखण्यासाठी सरकारने काय धोरण आखले आहे याची माहिती द्यावी; अशी मागणीही त्यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
महागाईला आळा घालण्यात सरकारला अपयश: रविशंकर प्रसाद
मागील तीन वर्षात जीवनावश्यक वस्तूंच्या दरात तब्बल तीनपट वाढ झाली असून महागाईने त्रासलेल्या जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केंद्रशासन करीत आहे; असा आरोप प्रसाद यांनी केला. महागाईने कळस गाठलेला असतानाच अवर्षण आणि दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे देखील याबाबत सहमत आहेत. महागाई आणि अवर्षणामुळे कल्पना करवत नाही एवढी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे; असेही ते म्हणाले.
