सलमान खान दुहेरी अडचणीत

सलमान खान आणि वाद यांचा खूप जुना संबध असावा असे आता वाटायला लागले आहे. त्यामुळेच नेहमी तो या ना त्या कारणाने वादाच्या भोवर्‍यात अडकलेला दिसतो. बॉलीवूडमधील आघाडीचा हिरो असून ही काही ना काही कारणामुळे तो सतत अडचणीत सापडलेला असतो.

त्याचा एक था टायगर हा बहुचर्चित चित्रपट १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे. मात्र या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत आता प्रश्न निर्माण झाला आहे. रॉ संघटनेत माजी गुप्तहेर असलेल्या स्वर्गीय रविंद्र कौशिक यांचा भाचा विक्रम वशिष्ठ यांनी फिल्म प्रोडक्शन कंपनीला याबाबत कायदेशीर नोटीस बजावली आहे. विक्रमचा मामा रविंद्र कौशिक यांना काही वर्षापूर्वी भारत सरकारने सिक्रेट मिशनसाठी पाकिस्तानात पाठविले होते. या चित्रपटाचा प्रोमो बघितल्यानंतर हे कथानक त्याच्या मामाशी संबधित असल्याचे वाटत असल्याने विक्रमने ही नोट्स पाठवली आहे. रिलीज होण्यापूर्वी विक्रम पूर्ण चित्रपट बघणार असल्याचे समजते.

तर दुसरीकडे १४ वर्षापूर्वी चिंकाराची हत्या केल्याप्रकरणी सलमान पुन्हा अडचणीत आला आहे. १९९८ मध्ये हम साथ साथ है चित्रपटाच्या शुटींग दरम्यान राजस्थानात दोन हरणे मारल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता. त्याप्रकरणाची सुनावणी आता राजस्थान हाय कोर्टात सुरु होणार आहे.

Leave a Comment