शिवसेनाप्रमुख रुग्णालयात दाखल: श्वसनाचा त्रास

मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मंगळवारी श्वसनाचा त्रास सुरू झाल्याने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीच्या विविध चाचण्या घेउन त्यांना घरी सोडण्यात येईल असे त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. जलील पारकर यांनी सांगितले.

शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया झाल्यानंतर सोमवारीच त्यांना लीलावती रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. बाळासाहेबांना सोमवारपासून बद्धकोष्टाचा त्रास होत आहे. त्यांना वैद्यकीय तज्ज्ञांनी सोमवारीच तपासण्या करून घेण्याचा सल्ला दिला होता. मात्र उद्धव सोमवारीच रुग्णालयातून परतल्याने बाळासाहेबांनी लगेच तपासण्या करणे टाळले. मात्र श्वसनाचा त्रास सुरू झाल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले.

Leave a Comment