मुखर्जी राष्ट्रपती होणे हे देशाचे दुर्दैव: केजरीवाल

नवी दिल्ली: भ्रष्ट मंत्र्यांच्या यादीत प्रणव मुखर्जी यांच्या नावाचा समावेश असून त्यांची राष्ट्रपती पदावर निवड होणे हे भारताचे दुर्दैव असल्याची टीका टीम अण्णाचे ज्येष्ठ सदस्य अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत केली.

जनलोकपाल विधेयक केंद्र शासनाने लवकरात लवकर संमत करावे या मागणीसाठी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि त्यांच्या टीमचे सदस्य बुधवारी जंतर मंतर येथे उपोषण करणार आहेत. या आंदोलनाच्या पूर्वसंध्येला अण्णा आणि केजरीवाल यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

जनलोकपाल विधेयकाबाबत केंद्रशासनाने फसवणूक केल्याच्या आरोपाचा पुनरोच्चार अण्णा यांनी यावेळी केला. लोकपालाची मागणी ही देशाच्या भल्यासाठीच आपण करीत आहोत. मात्र याबाबत सरकारचे प्रतिनिधी म्हणून सलमान खुर्शीद यांनी दिलेले आश्वासन पाळलेले नाही; अशी टीका करून अण्णा यांनी; लोकपालबाबत सरकारने २७ जुलै पर्यंत निर्णय न घेतल्यास २८ पासून आपण पुन्हा उपोषण सुरू करू; असा इशाराही दिला.

Leave a Comment