स्वखर्चाने लंडन ऑलिम्पिकला जाईन – कलमाडी

नवी दिल्ली: राष्ट्रकुल घोटाळ्यात अडकलेले खासदार सुरेश कलमाडी भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष म्हणून नव्हे तर आपल्या वैयक्तिक खर्चाने क्रीडाप्रेमी म्हणून लंडन ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांना उपस्थित राहतील; अशी ग्वाही कलमाडी यांच्यावतीने त्यांचे वकील एड.मुकुल रोहतगी यांनी दिल्ली उच्च न्यायालयात दिली. कलमाडींच्या लंडन वारीला विरोध करणारया याचिकेवर न्यायालय बुधवारी निर्णय देणार आहे.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या संयोजन समितीचे प्रमुख म्हणून काम पाहिलेले कलमाडी भ्रष्टाचार प्रकरणात आरोपी असल्याने त्यांना देशाचे प्रतिनिधी म्हणून लंडनला जाण्यास परवानगी देऊ नये; अशी मागणी करणारी जनहित याचिका एड. राहुल मेहेरा यांनी दिल्ली उच्चन्यायालयात केली आहे. कलमाडींवर न्यायालयात खटला सुरू असताना त्यांनी जनतेच्या पैशाने देशाचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी लंडनला जाणे अयोग्य असून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेच्या नैतिक नियमांचे ते उल्लंघन ठरेल; असा दावा एड. मेहेरा यांनी याचिकेत केला आहे.

कलमाडी हे ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष म्हणून नव्हे तर व्यक्तिगत पातळीवर एक क्रीडाप्रेमी म्हणून लंडनचा दौरा करतील; असे एड. रोहतगी यांनी एड. मेहेरा यांचा प्रतिवाद करताना सांगितले.

Leave a Comment