शर्लिन चोप्रा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

मॉडेल व अभिनेत्री शर्लिन चोप्रा काही ना काही कारणाने नेहमीच प्रसिद्धी झोतात असते. काही दिवसापूर्वीच ट्विटरवर न्यूड फोटो अपलोड करून तिने सर्वत्र खळबळ माजवली होती. हे प्रकरण अजून शांत होते ना होते तोच तिने आणखीन एक प्रताप केला आहे. प्लेबॉय मॅगेझीनसाठी तिने पुन्हा एकदा न्यूड फोटोशूट केला आहे.

फक्त पुरुषासाठी असलेल्या प्लेबॉय मॅगेझीनवर झळकणारी शर्लिन पहिली भारतीय असणार आहे. याबबत तिने ट्विटरच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे की, सध्या जो ट्विटरवर टाकलेला फोटो आहे तो शुटिंगच्या सरावावेळी काढलेला आहे. प्लेबॉय मॅगेझीनवर जो फोटो असेल त्यामुळे सर्वांचेच होश उडतील.

शर्लिनचा हा फोटो नोव्हेंबर २०१२ च्या प्लेबॉय मॅगेझीनमध्ये झळकणार आहे. यापूर्वी एकदा ट्विटरवर प्रसिद्ध केलेला फोटो उत्तेजक असल्यामुळे काढून टाकण्यात आला होता. त्यामुळे आता पुन्हा एकदा अशा स्वरूपाचा फोटो तिने ट्विटरवर अपलोड केल्याने तिचे ट्विटरवरील अकाउंट बॅन केले जाते की  तिच्यावर अन्य काही  कारवाई केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे