भ्रष्ट मंत्र्यांना पाठीशी घालण्यासाठी राष्ट्रवादीचे दबावतंत्र: देवेंद्र फडणवीसांचा आरोप

मुंबई: केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे राजीनामा नाट्य केंद्रीय मंत्रिमंडळातील ज्येष्ठता हे नाही; तर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मंत्र्यांनी केलेले घोटाळे बाहेर काढणाऱ्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना हटविण्यासाठी आहे; असा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

प्रशासकीय कामांमध्ये सुरू असलेला कालापव्यय हे मुख्यमंत्री चव्हाण यांना हटविण्यासाठी कारण होऊ शकते. मात्र ‘राष्ट्रवादी’ नेत्यांना त्याच्याशी काही देणे घेणे नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे घोटाळे; विशेषत: सिंचनयोजनांमधील भ्रष्टाचार झाकून ठेवण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी उघडकीला आणला ही राष्ट्रवादीची खरी पोटदुखी आहे; असा आरोप करून फडणवीस यांनी राष्ट्रवादी स्वार्थासाठी आणि भ्रष्ट मंत्र्यांना पाठीशी घालण्यासाठी दबावतंत्र वापरीत आहे; असे मत व्यक्त केले.

Leave a Comment