एफआयआयतील गुंतवणूक १० अब्ज डॉलर

नवी दिल्ली, दि. २३ – भारतीय शेअर बाजाराबद्दल विदेशी संस्थागत गुंतवणूकी(एफआयआय) चा विश्वास पुन्हा बळावत आहे. या वर्षी शेअर बाजारात एफआयआयची गुंतवणूक १० अब्ज डॉलरचा आकडा ओलांडला आहे. जून महिन्यात शेअर बाजारात विदेशी गुंतवणूक १.६७ अब्ज डॉलर राहिली.

भारतीय प्रतिभूति व विनिमय बोर्ड (सेबी) च्या आकडेवारीनुसार गेल्या तीन महिन्यात एप्रिल ते जूनदरम्यान विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून १,९५७ कोटी रुपये काढले आणि २० जुलैपर्यंत त्यांनी भारतीय शेअर बाजारात ९,२५५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली.

सेबीनुसार, एफआयआयची शेयर बाजारातील गुंतवणूक १०.१७ अब्ज डॉलर (५१,२४८ कोटी रुपये) वर पोहोचली आहे. भारतीय शेअर बाजारात एफआयआयचा विश्वास वाढल्यानंतरही बाजाराचा मूड बदलला नाही.

मुंबई शेअर बाजाराचा सेंसेक्स २० जुलै रोजी संपलेल्या सप्ताहात १२०.४१ अंकांच्या घसरणीसह १७,१५८.१४ अंकावर बंद झाला.