लोकसभा निवडणूक : २०१४ मध्ये टीम अण्णाचा देखील उमेदवार?

नवी दिल्ली,२३ जुलै-भ्रष्टाचारविरूद्ध मोहिम चालवणारे व लोकपालची लढाई लढत असलेल्या टीम अण्णाने संकेत दिले की, तो २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत आपला उमेदवार उभा करू शकतो. टीम अण्णाचे सदस्य अरविंद केजरीवाल यांचे म्हणणे आहे की, आगामी लोकसभा निवडणुकीत गैर काँग्रेस व गैर भाजपा मोर्च्याला समर्थन दिले जाऊ शकते.

अरविंद केजरीवाल पुढे म्हणाले की, माझ्या मतानुसार सामान्य लोकांनीही आपला उमेदवार उतरविला पाहिजे. टीम अण्णा त्या उमेदवारांचे समर्थन करेल. भ्रष्टाचारविरूद्ध आंदोलन २०१४ मध्ये एखाद्या क्रांतीने कमी सिद्ध होणार नाही कारण आंदोलनाचे ध्येय शासन व्यवस्थेला बदलण्याचे आहे. लोकपाल विधेयक पारित करण्याच्या मागणीवर या महिन्याच्या २५ जुलैपासून जंतरमंतरवर उपोषण करणारे अरविंद केजरीवाल म्हणाले की, टीम अण्णासाठी ही आरपारची लढाई असून ती बलिदानासाठी तयार होऊन उपोषणावर बसेल. यावेळी अण्णा हजारेऐवजी त्यांच्या संघातील केजरीवाल, मनीष सिसौदिया व गोपाल राय इत्यादी उपोषण करतील.

केजरीवाल म्हणाले, ’या उपोषणाने रामराज्य येणार नाही. लढाई अजुन दिर्घ आहे. परंतु आमच्यासाठी ही आरपारची लढाई आहे. आम्ही बलिदानासाठी तयार होऊन उपोषणावर बसु.’ त्यांनी आरोप लावला की, सरकारच्या ३४ मंत्र्यांपैकी १५ भ्रष्टाचाराचे आरोपी आहेत. जर लोकपाल बनला तर अनेक मंत्री तुरूंगात असतील. यामुळे यांची इच्छा लोकपाल कधीही न बनवण्याची असेल. त्यांनी संसदेत काही सदस्य आरोपी असल्याची पुनरावृत्ती केली. पंतप्रधानसहित १५ मंत्र्याविरूद्ध आरोपांची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करून लोकपालची लढाई लढण्याची त्यांनी चर्चा केली. त्यांनी म्हटले की, सरकारसह सर्वात अगोदर लोकपालसाठी जी संयुत्त* मसुदा समिती बनवण्यात आली होती, त्यात समाविष्ट पाच मंत्र्यांपैकी चारवर आरोप आहे.

Leave a Comment