अजय देवगण करणार स्टंट

अभिनेता अजय देवगणने प्रेक्षकासाठी वेगळ्या धाटणीचा चित्रपट निर्मिती करण्यासाठी कंबर कसली आहे. आगामी काळात त्याचा सन ऑफ सरदार हा चित्रपट येत असून या चित्रपटात तो एक वेगळा स्टंट करणार आहे. या चित्रपटात अजय घोड्यावरून दौडत येऊन कारवर उडी मारण्यार असून अशा स्वरूपाचा स्टंट यापूर्वी त्याने  फुल और काटे चित्रपटात केला होता. मात्र यावेळी त्याच्या सोबत घोडे आहेत.

हा सीन पतियाला येथील सुमारे २५० वर्षापूर्वीच्या किल्ल्यात शूट करण्यात आला आहे. हे चित्रीकरण पार पडण्यास्ठी तीन ते चार दिवसाचा कालावधी लागला. या सीनचे शुटींग अजयला एकदम परफेक्ट हवे होते. त्यासाठी त्यांनी भरपुर मेहनत घेतली होती. या स्टंटचे दिग्दर्शन जयसिंहने केले असून त्यानेच यापूर्वीच्या फुल और काटे या चित्रपटतील स्टंटचे दिग्दर्शन केले होते.

जयसिंहसोबत अजयने बोल बच्चन, सिंघम, गोलमाल३ सारखे चित्रपट केले आहेत. या सर्वच चित्रपटात वेगवेगळे स्टंट दाखवून अजयने प्रेक्षकाची चांगलीच करमणूक मात्र केली आहे.

Leave a Comment