रेव्ह पार्टीप्रकरणी राहुल शर्मा, वेन पार्नेलच्या रक्ताचा नमूना पॉझिटीव्ह

नवी दिल्ली-मुंबई, दि. २१ – काही दिवसांपूर्वी  हॉटेल ओकवूड येथे मुंबई पोलिसांनी छापा मारून रेव्ह पार्टी उधळली होती. त्यावेळी ९६ जणांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी सर्वप्रथम ४४ जणांचे रक्ताचे नमुने पॉझिटीव्ह आले. तर आता आणखी ४२ जणांचाही अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यामध्ये क्रिकेटपटू राहुल शर्मा आणि वेन पार्नेल यांचाही अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे सर्वत्र मोठी खळबळ उडाली आहे.

या प्रकरणाबाबत दोघांनी रेव्ह पार्टीत सहभागी झाल्याचे फेटाळले होते. एका वाढदिवसाच्या पार्टीसाठी हॉटेल ओकवुडमध्ये गेलो होतो. तिथे रेव्ह पार्टी सुरू होती, हे माहिती नव्हते, असे दोघांनी सांगितले होते. राहुल शर्माने तर रक्ताचा नमुना पॉझिटीव्ह आल्यावर क्रिकेट सोडून देऊ, असे म्हटले होते.

राहुल शर्मा आणि वेन पार्नेल हे आयपीएलमध्ये पुणे वॉरियर्सकडून खेळतात. तर पार्नेल हा दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज आहे.

केवळ दोन महिलांच्या रक्ताचा नमुना निगेटीव्ह आला आहे. गेल्या वेळेस अभिनेता अतूल अग्निहोत्रीचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता.

Leave a Comment