शत्रूघ्न सिन्हा आयसीयूतून बाहेर

मुंबई, दि. १९ – बॉलीवुडचे बिहारी बाबू ऊर्फ शॉटगन शत्रुघ्न सिन्हा यांच्यावर सोमवारी अंधेरीतील कोकिलाबेन रूग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यांच्या घरी सुरू असलेल्या रंगरंगोटीच्या कामामुळे श्वास घेण्याचा त्रास सुरू झाल्यानंतर २ जुलै रोजी रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते.

काही दिवसांपूर्वी ६६ वर्षीय सिन्हा यांच्यावर बायपास सर्जरी करण्यात आली. सिन्हा यांचे नातेवाईक आणि सिनेनिर्माते पहलाज निहलानी यांनी सांगितले की, सिन्हा यांना आज सकाळी आयसीयूतून बाहेर  पाठविण्यात आले. आता ते ठीक आहेत.  डॉक्टरांनी सिन्हा यांना आणखी दोन ते चार दिवस रूग्णालयात थांबण्याचा सल्ला दिला आहे.