वॉशिंग्टन, दि. २० – अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामांचे मुख्य तांत्रिक अधिकारी राहिलेले मूळ भारतीय अनीश चौपडा यांनी डेमोक्रेटिक पक्षाकडून २०१३ मध्ये वर्जीनियाचे लेफ्टीनेंट गव्हर्नर पदाचा उमेदवार बनण्यासाठी नामंकन भरण्याचा निर्णय घेतला आहे. चौपडा यांनी सहा महिन्यांपूर्वी व्हाइट हाउसमधील ओबामांची साथ सोडली.
राज्याची राजधानी रिचमंडच्या प्रसिद्ध झालेल्या एक वक्तव्यात ३९ वर्षीय चोपडा यांनी म्हटले की, आम्ही बदलत्या युगात जगत आहोत. आमचे समुदाय, आमचे राष्ट्रमंडळ व आमच्या देशातील लोकांना व्यवहारिक रूपाने आपल्या समस्याचा तोडगा हवा आहे जेणेकरून संधी निर्माण होईल आणि जीवनाच्या गुणवत्तेत सुधारणा होईल. त्यांनी म्हटले की, जानेवारीत अमेरिकेचे मुख्य तांत्रिक अधिकारी पद सोडल्यानंतर माझे मित्र, शेजारील व्यापारी व समुदायातील लोकांनी मला या पदासाठी निवडणुक लढवण्यासाठी प्रेरित केले.
यांच्या मदतीने प्रेरित होऊन मला ही घोषणा करण्यात खूप आनंद होत आहे की, मी काही महिन्यानंतर २०१३ मध्ये होणार्या लेफ्टीनेंट गव्हर्नर पदावर डेमोक्रेटिक पक्षाचा उमेदवार बनण्यासाठी नामांकन दाखल करेल. ओबामा प्रशासनासोबत काम करण्यापूर्वी चोपडा वर्जीनियाचे तेव्हाचे गव्हर्नर किन केन यांचे तांत्रिक सचिव म्हणून काम केले.
रिचमंड टाइम्सनुसार आतापर्यंत डोमोक्रेटिक पक्षातील इतर सदस्याने वर्जीनियाहून आपल्या दावेदारीची घोषणा केली नाही.